लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती: आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य. आर्थिक बाजू आणि शेळ्या: आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्य...