Skip to main content

एक प्राणी लुप्त होत चालला आहे

लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती:
आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य. 
आर्थिक बाजू आणि शेळ्या:
आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्या असणारा प्राणी म्हणजे शेळी.पण ज्यांच्या शेळ्या असतात त्यांना समाज रचनेनुसार जरी स्त्रीला लक्ष्मी समजाव लागतं असलं तरी शेळी असणाऱ्यांना बोकड जन्मल्यावरच लक्ष्मी दिसते हीच ह्या समाजाची खासियत आहे. पैसा ह्या आयुष्यात फक्त गोष्ट आहे, ज्याला कोणाची गरज नसते. पण सगळ्यांना त्याची गरज असते. त्यामुळे विगन आणि व्हेज असणारे का मारता प्राण्याला विचारत असतात. शेतकरी उद्योगधंदे आहेत हे, जर हे बंद केले तर शेतकऱ्याला फक्त अन्न म्हणून पाणी पिऊनच झोपाव लागेल. खरंच विचार करायची गोष्ट आहे आपल्या देशात 5 किलो तांदूळ आणि गहू घ्याव लागतंय शेतकऱ्याला त्याला कृषिप्रधान कस म्हणावं. सामाजिक स्थिती एवढी खराब आहे आपल्या देशात शेतकरी हा आर्थिक दुबळा मनुष्य बनवला गेला आहे, व्यवस्थेमध्ये बदल न झाल्यामुळे. विचार करा अन् सोडून द्या.

वैयक्तिक मत :
आतली गोष्ट सांगतो, बोकडाची नळी आणि मटण, चाप खाण्यात जी मज्जा आहे ना, ती नरकात यमराजाकडून तेलात तळून घेण्यात सुद्धा नाही. मुळात माणूस स्वजातीय हिंसा करत असतो, परजातीय हिंसा करणार यात शंकाच नाही. माणसाच्या प्रवृत्तीला प्रेरित होऊन कुत्रीसुद्धा पिसाटतात अन् आजकाल त्यांनी सुद्धा परजातीय हिंसा सुरू केली. शेळ्यांची पिल्ली फाडून खाणे त्यांनी त्यांचा धर्म बनवला आहे. म्हणून म्हणतोय मटण खाण्याची वासना पूर्ण केल्याशिवाय मरू नका तसे आपण पाप रोजच करत असतो पण ते कसे तर सूक्ष्म कीटक आपल्या पायामुळे रोज मरत असतात त्यामुळे वशाटप्रेमी लोकांनी आपली वासना कोल्हापुरी लोकासारखी केली पाहिजे अन् खच्चून अन् बक्कळ मटण खाल्लं पाहिजे ह्या शुभेच्छा. मी मोठा मटनप्रेमी असल्यामुळे संधी मिळाली की सोने केल्याशिवाय राहत नाही.

बालमनाचा कवी आणि निरोप:
माझ्या मनाला उमगलेले एकच ते म्हणजे

शेळ्यांनो जरा माघे फिरा,
तुमच्या मागे गवताचा हिरा.
तुमचे पोट होईल मग टमबारे,
आता पैसे येतील आमच्याकडे बरे.
तुमच्यामुळे वाढले हॉटेलचं पसारे,
आता खालले जाईल मटणचं सारे.

कवितेचा आशय जर नाही समजला तर आपआपल्या सोयीचा अर्थ लावून वाचणारेने मोकळे व्हावे, कारण कवी कारणं देण्यासाठी अजिबात उत्साही नाहीये. ही दखल मात्र घेण्यात यावी. आवडला तर कमेंट करायला विसरू नका.....

रजा घेतो,
धन्यवाद,
आपलाच सारंग...

Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल  मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...