Skip to main content

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल 
मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिकेट मध्ये ओपनर असणारा माझा मित्र. किती अनुकूल परिस्थितीत चेहऱ्यावरचे हसू व संयमपना न सोडणारा माझा मित्र असं मृत्यूशय्येवर झोपला आहे. त्यादिवशी देव हा घातकी काळ आहे, करुणानिधी सुद्धा क्रूर आहे ही भावना बिंबली माझ्या मनावर. आपला जिवाभावाचा मित्र जळताना पहिला मी वेदना खूप असह्य होत्या. खुपदा आठवण येते मित्रा तुझी, आजपर्यंत तुझ्या घराकडे जाण्याची हिम्मत होत नाही. कारण तिथेच बसून आपल्या गप्पा खुपदा रंगल्या आहेत.
बदामीला डोळे भरून पाहताना तात्या 


नळदुर्गच्या महादरवाजा पासाला एक क्षण 


आठवणीतला तात्या
माझ्या आठवणीतला तात्या म्हणजे समाज एक ideal मुलगा पाहत असतो तसा होता. सोमवार ते गुरुवार किंवा शुक्रवारी BMIT मध्ये Engineering नंतर लगेच शनिवार ते रविवारी शेती त्यात मळा फुलवणारा रॉयल शेतकरी. ज्याची शेती बघुन फुल टाइमर शेतकऱ्याला लाज वाटेल असा मळा तयार केला होता. थोडे दिवस आधी माझं त्याचं बोलणं झालं होतं फोनवर त्याला म्हणालं होतो मी एक्स्पोर्ट quality ची केळी पिकवून दाखव, आपण काही करून jugad लावून पाठवू आपला माल विदेशाला असं मी त्याला बोललो आणि त्यानं मला विचारलं होतं दिवाळीला येणार नाही का बे. आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या होत्या. हेच शेवटच बोलणं. खरंच या वर्षी ६ जूनला रायगडाला जाऊ असं बोलणं झालं होतं. आमचा किस्सा आहे Agastya foundation तर्फे MIT मध्ये जॉबला होतो त्यावेळेस त्याचा कॉल आला मला लगेच कळलं की याला मराठा आरक्षण मोर्च्यात जायचं आहे " साऱ्या, पाटील येणार आहे जाऊ आपण मग बोललो अर् मी कामावर आलो हाय School visit अलीकडे scheduled केली त्याचं कॉलेज पासली एक शाळा निवडली, थोडं काम करून कल्टी मारली विचार केला लय लय मॅनेजर ओरडेल असं आलो. तिथून गड्याने टोप्यांचा जुगाड केला, शेले घेतले. लगेच सोलापूर गाठले गर्दी होयला सुरुवात झाली होती, बऱ्याच लोकांनी जेवणाची सोय केली होती डब्बा ऑफिसवर होता कुरुलाच्या एक संघटनेने गाव वर्गणीतून चांगल ठेवलं होतं भंडारा खाण्यात आम्ही दोघं एक्सपर्ट होतो. आपला Confidence चांगल्या असल्यामुळे मी लोकांना "लाइन मध्ये या", "थांबा", "हळू हळू घ्या","ताटात काही राखू नका" असं करत लाइन आम्हीच शिरून जेवणं घेतलं तरी माझ्यात सामाजिक कार्यकर्ता संपणे. तात्या म्हणाला अर् बास कर नाटकं ये इकडं खाऊन घेऊया. 12 ते एकला होणारी सभा जवळपास 2.30 ते 3 झाले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकात घिरट्या घालत होतो. त्याचे मित्र आले मग आम्ही आवश्यक ते फोटो session करून घेतले. दुसऱ्याचे फोटो काढणे आमच्यावर टाकलं कार्य असं समजून आम्ही दोघांनी तिथल्या बऱ्याच लोकांचे फोटो काढले. पाटील आले मग तात्या मात्र गर्दीत हरवून गर्दी सोबत पुढे जाऊन बसला, मी मात्र मराठ्यांचा समुद्र सोलपूरला कसा उसळला आहे त्याचं निरीक्षण करत होतो त्या क्षणाचा साक्षीदार होत होतो आम्ही. पाटलांच भाषण शैली चांगली आहे लोकांना त्यांच्या भाषेवर आक्षेप कारण गावाकड शिवराळ भाषेत टपू दिले जातात. टपू म्हणजे टोमणे दिले पाटलांनी. सभा संपली त्याला कॉलेज सोडलं पण जाताना मोर्चाची चर्चा तात्या खूप खुश झाला होता. येताना येणारे जाणारे घोषणा देऊन चेतवले अश्या क्षणाचा साक्षीदार होता त्यावेळेस आनंद वेगळाच असतो. साक्षात सगळं भेटलं यादिवसाच "एवढच उरतं की याच साठी केला अट्टाहास की शेवट एवढा गोड व्हावा म्हणून" खुप उत्साही तात्या मी पाहिला आहे तो एक दिवस होता, पाडव्याच्या दिवशी सरणावर शांत झालेला माझा मित्र तो एक वेगळाच होता दिवस घातकी होता.
मोर्चादरम्यान घेतलेले छायाचित्र


आठवण 


तात्या, मी आणि फिरणं 
आम्ही फारसे सोबत फिरलो नाही त्यात एक ट्रिप नळदुर्गची असेल दुसरी बदामाची असेल बाकी छोट्या छोट्या आम्ही गेलोच आहोत. दयानंद कॉलेज सफर दाखवली होती त्याला ती जागा काय एवढी प्रेक्षणीय नाही त्याला सांगितलं होतं तरी त्यावेळेस परिस्थितीमुळे admission घेतलं. १२ वी झाल्यानंतर परत कशाला घ्यायचे तर engineering ला घ्यायचं ठरलं. दोघांनी जाऊन ॲडमिशन फॉर्म भरून आलो. कायम मला जरा हुशार समजायचा मला घेऊन जायचा मला कधी नाही म्हणता येतं नसायचं. माझ्या एका वाढदिवसाला मित्रांना काय दाखवायचं म्हणून माझ्या डोक्यात असलेलं चालुक्यांचीं राजधानी बदामीला घेऊन गेलो होतो. सगळ्या अंगल ने छायाचित्र टिपून गडी एन्जॉय करत होता. त्याला फोटो काढायला खूप आवडतात त्याने तेच केलं. बदामी कर्नाटकमध्ये असल्यामुळे कोणाला तरी कन्नड भाषेत बोलता आलं पाहिजे म्हणून माझा मित्र केदार याला तयार करून घेऊन गेलो तो आमचा traslator होता बदामीमध्ये सगळं पाहिलं पट्टडकल चालुक्यांची राज्याभिषेकाची जागा ती पाहिली अगदी पाहिजे तशी ट्रिप झाली. मज्जा आली या ट्रिपमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. माझ्या स्मरणात राहिलेली बदामीची सफर आहे.
भूतनाथ मंदिरात केदारने टिपलेला अनाहुतपणे एक क्षणचित्र 



छायाचित्रांचा नादीक




अगस्त्या तलाव पाशी टिपलेला त्याचा एक क्षण 


गावातल्या मॅप वर आमचा फोटो आहे




शेवट म्हणून एवढंच म्हणतो मित्रा व पू म्हणतात ना "आठवणी माणसाला छळतात" तस आहे. 
"संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; तू कुठे दिसलाच नाही"

मी लिहिलेल्या ओळी तुझ्यासाठी अर्पण 

त्याच्या उत्साही वृत्ती अचानक घात केला
चांगल्यातला चांगला एक त्याने नेला
माझा देव वैरी ग हाय 
मैतर माझा वेगळा ग माय

आमच्या प्रत्येक सणातला 
एक दिवा त्याने चोरून नेला
आमचा आनंद गेला ग हाय 
मैतर माझा वेगळा ग माय

कायम देवाकडे तक्रार आहे माझी तुझ्यासाठी. तुला कधी बोलू शकलो नाही Lob U मित्रा. Miss you तात्या....❤️🫶

रजा घेतो खूप आहे तुझ्यासाठी 
तुझाच सारंग





Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...