लिहिण्यास कारण की : पुणे विद्यापीठात झालेल्या उत्कर्षाच्या कार्यक्रमाला मी पूर्णवेळ पुणे विद्यापीठाच्या मार्फत माध्यमांचा प्रतिनिधी कार्यक्रमांचे वार्तांकन करत होतो. त्यादरम्यान पुणे विद्यापीठाच्या संघाची थीम 'वारकरी संप्रदाय' यावर आधारित होती. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठाच्या पथ्यनाट्याचे नाव होते "होय आम्ही आमचं मूळ विसरलोय" त्यामध्ये संत साहित्यातील आशय काढून भाष्य केले होते आणि आजच्या घडीला संत साहित्य किती कालसुसंगत आहे यावर उत्तमरित्या भाष्य केले होते. मग मी विचार केला 'आपल्याला किती संत साहित्य माहिती आहे?' किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली आणि समर्थ रामदास स्वामीनी दासबोध लिहिली हे माहित आहे. संत साहित्यांची नावच आपल्याला माहित आहे त्या पलीकडे जाऊन कधी आपण त्याला वाचण्याचा प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न मनाला भेडसावत होता. मग खरंच वाटायला लागलं की आपण आपलं मूळ विसरत चाललोय. आपलं म्हणजे असं झालं आहे की घरात ज्ञानरूपी सोन्याची खान असताना, आपण फक्त ऊर भरून अभिमानच बाळगायचा "संत साहित्य ड...