धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी. सौजन्य: संग्रहित छायाचित...
एक वरीस सरल मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...