PMA-DOCJ Lecture पोस्ट प्रोडक्शन म्हणजे काय रे भाऊ?
पुण्यातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर हे एक अनोखे रत्न आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, त्याच्या स्थापत्यशैलीतून आणि शिल्पांमधून प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या तीन सोंड असलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. सौजन्य : Google.com मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यशैली मंदिराच्या उभारणीची सुरुवात शहाजीराजांच्या काळात झाली, तर १७७०च्या सुमारास इंदूरजवळील गोसावी भीमनिपजी यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या मंदिराच्या रचनेत राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतातील वास्तुशैलींचा मिलाफ दिसून येतो. पूर्ण दगडी बांधकाम, उंच प्रवेशद्वार आणि दाराच्या चौकटीवरील शिल्पे यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेला वेगळेपण प्राप्त झाले आहे. सौजन्य : Google.com प्रवेशद्वारावरील शिल्पे आणि राजकीय दृष्टिकोन मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत - शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर आणि दशावतार. मात...
Comments
Post a Comment