छातीचा बुरुज अन कुऱ्हाडीची तलवार करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती जाहले ! राज्याभिषेक म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तो स्वाभिमान, पराक्रम आणि स्वराज्याच्या वचनाचा पुनस्मरण सोहळा आहे. यंदाही १६ जानेवारी रोजी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर हा सोहळा अनुभवणं म्हणजे एक विलक्षण आत्मिक समाधान आणि प्रेरणादायी क्षण! रायगडवारी म्हणजे मनाला उभारी "रायगडवारी म्हणजे मनाला उभारी" असं का म्हणतात, हे यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याने पुन्हा सिद्ध केलं. हा केवळ इतिहासाचा सोहळा नसून, आजच्या पिढीने आपली निष्ठा आणि लढण्याची उर्मी जिवंत ठेवण्याचा दिवस आहे. १५ जानेवारीपासूनच रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांची मालिका सुरु झाली होती. गडकिल्ले संवर्धन समितीने फुलांच्या सजावटीची जबाबदारी पार पाडली, तसेच "राष्ट्रप्रथम" उपक्रमांतर्गत जलाभिषेकाचा मान देखील मिळाला. छत्रपती संभाजी महाराज – क्रांतीचे अधिष्ठान धाकलं धनी छत्रपती झालं, क्रांतीचे अधिष्ठान, क्रांतीसूर्य श...