"सुखाची व्याख्या कितीही आणि कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीतच येतो...#मी_राजगड
दोन तपे कारोभारी।जयावरी राहिले॥"
या दोन ओळीत सारं असणारा म्हणजेच राजगड किल्ला पहिले २६ वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला सह्याद्रीमधील मुरुंब देवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे.नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुब्देवाचा डोंगर उभा आहे. किल्यावर सुवेळा माची,गुंजवणे दरवाजा,आळू दरवाजा आणि पाली दरवाजे,संजीवनी माची,पद्मावती माची या तीन माच्या व तीन दरवाजे आहेत हे सर्व पहिल्या ओळीचा स्पष्टीकरण आहे. तसेच दुसरी ओळ सांगते या दुर्गराजाला दोन सदरा म्हणजे कार्यालय आहेत व "गडांचा राजा " आणि "राजांचा गड " असा बहुमान मिळवलेला राजगड हा शिवकालीन इतिहासातील महत्वाचा गिरीदुर्ग आहे. राजधानी अशी बनवा की चार लोक बोलले पाहिजेत आगाबाबोव ढगात तर आलो नाय आपण महाराष्ट्रात असलेल्या दोन स्वर्गा पैकी असणारा एक म्हणजे दुर्ग राजगड...दुर्ग हा शब्द सुद्धा छत्रपतीच्या मराठी शब्दकोषातून दिला गेलेला शब्द आहे म्हणजेच याचा अर्थ दुर्गम निगम म्हणजेच अवघड रस्ता एक हिंदी भाषिक कार्यकर्ता बोलला आम्ही गड चढत असताना ये सैनिक कैसे चढते होंगे मी सांगितलं त्याला "सैनिक नही मराठी मावळे चढते थे" का जायचं राजगडावर हा प्रश्न आला तर महाराज आणि त्यांचं व्यवस्थापन ४५० वर्षांपूर्वी सुद्धा पाण्याचं उत्तम नियोजन आहे ते मग तिन्ही माच्या असो किंवा बालेकिल्ला आपण आजकाल बघतो महाराष्ट्रात नेतेची पाण्यावर मते काय आहेत... मला वाटत की अजूनही या गडाच्या दगड धोंड्यात आपला राजा अजून जिवंत आहे...
Comments
Post a Comment