धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.
वेगळाच अध्याय अशोकरावांनी घडवला त्यांनी गडचिरोली, कोल्हापूर येथे काम केले होते. त्यांना भरघोस प्रेम सोलापूरने दिले. आजकाल नेत्यांपाशी आपल्या जिभेचा सडा टाकणारे, गाय कमी चाटते वासराला त्यापेक्षा जास्त चाटणारे अधिकारी पाहिले की वाटतंय साहेब तुम्ही असायला पाहिजे होतं. खरं तर आर. आर. आबा सारखा गृहमंत्री असल्यामुळे एवढ बळ येतं अश्या अधिकाऱ्यात. SMT फोटो पुन्हा वाटतं असा अधिकारी पुन्हा होणे नाही. तुम्ही ज्या दिवशी गेलात २६/११/२००८ त्यादिवशी सोलापूर हळहळले होते, एक शहर आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं दुःख व्यक्त करत होता.आजही सोलापूर अन् बाळे येथे तुम्हा सर्वांच्या बलिदानाची याद केली जाते.
बाळ्यात तिरंगा प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते, तुम्ही रक्त देशासाठी सांडले तसे आमचे रक्त देशवासियांसाठी या भावनेत तुम्हाला श्रध्दांजली अर्पण करत असतो. मी दोन वर्षे रक्तदान केले आहे तिरंगा प्रतिष्ठान बाळे तर्फे, त्यामुळे मी किंवा सोलापूर तुम्हाला विसरलेले नाही. भावपूर्ण श्रद्धांजली अशोक कामटे साहेब...!
अधिक माहितीसाठी : पुस्तक : टू द लास्ट बुलेट ; लेखिका विनिता कामटे देशमुख
विशेष धन्यवाद :
हे पुस्तक मी वाचण्यामागे माझ्या दोन मित्रांचा हात आहे. आनंद आतकरे अन् वैभव मगर. धन्यवाद अन्या आणि वैभ्या...❤️
हे पुस्तक मी वाचण्यामागे माझ्या दोन मित्रांचा हात आहे. आनंद आतकरे अन् वैभव मगर. धन्यवाद अन्या आणि वैभ्या...❤️
Salam
ReplyDelete